स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे व स्वातंत्र्यासाठी लढा देणारे अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.
न्यू इंग्लिश स्कुल आडगाव , ता.जि.नाशिक माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/०१/२०२३ रविवार न्यू इंग्लिश स्कुल आडगाव या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 1994-95 मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या अद्यापकांसमवेत विद्यार्थी संमेलन रविवार दिनांक ८/०१/२०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केले होते.त्या प्रसंगी मला उपस्थित राहण्याचा योग आला. विद्यालयात नवीनच बांधलेल्या वर्गात संमेलन आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी वर्ग अतिशय छान सजविलेला होता. दरवाजास फुग्यांची कमान करून सजावट केली होती,एकंदरीत सर्व तयारी छानच केली होती. कर्मवीरांना अभिवादन राष्ट्रगीताने संमेलनाची सुरुवात केली. श्रीयुत सतीश रिकामे यांनी कार्लायक्रमाचे सूत्र संचालन केले. सदर संमेलनास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर तथा मॅनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य श्रीयुत वडजे बापू ,सौ.वडजे ताई, श्रीमती कुशारे...
न्यू इंग्लिश स्कुल अस्तगाव,ता. राहाता,जि. अहमदनगर माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/११/२०१८ गुरुवार न्यू इंग्लिश स्कुल अस्तगाव या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २००७-०८ मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या अद्यापकांसमवेत विद्यार्थी संमेलन गुरुवार दिनांक ८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले. सर्व प्रथम कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री सर्जेराव मते सर, श्री बनसोडे सर श्री तुपे सर आदि च्या हस्ते करण्यात आले. मला या निमित्ताने विद्यालयात उपस्थित राहण्याचा योग आला. मी न्यू इंग्लिश स्कुल अस्तगांव या विद्यालयात दि. १/११/२००४ पासून पर्यवेक्षक या पदावर मोऱ्हांडा ता. मोखाडा,जी. ठाणे या विद्यालयातून बढतीवर बदलून आलो होतो. खरं तर मी विद्यालयात दि. ९/०६/२००६ पर्यंतच साधारणतः १ वर्ष, ७ महिने विद्यालयात कार्यरत होतो. मला नव्यानेच प्रमोशन मिळाले होते व मला आडगाव विद्यालयात खूप काटेकोर काम करायची सवय लागली होती. त्यामुळे मी अस्...
मी वसंत मुरलीधर सालगुडे (नाशिक) श्री विलास, सुनिल, ज्ञानेश्वर शिवाजी खांडबहाले (महिरावणी ) आदि आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच असलेले कळसूबाईचे शिखर सफर करण्याचे ठरविले. आम्ही सर्वानी ठरवले की, दि. १५/१०/२०१७ रविवार रोजी पहाटे ५ वाजता कळसुबाई शिखर ट्रेकिंग साठी नाशिक हून निघून टाकेद मार्गे जायचे. परंतु निघताना थोडा उशीर होऊन सकाळी ६ वाजता टाकेदला निघालो. (१)सर्वतीर्थ टाकेद टाकेद नाशिक पासून साधारणतः ५२ किलोमीटर आहे. आम्ही नाशिकरोड हुन पांढुर्ली मार्गे टाकेद ला निघालो. व सकाळी ८.३० वाजता तेथे पोहचलो. सर्वतीर्थ टाकेद हे देखील अतिशय चांगले देवस्थान आहे. तेथे जटायूचे मंदिर व मोठे शिल्प आहे. रामायण काळात प्रभू श्रीराम ,लक...
Comments
Post a Comment