New English School Astgaon, Former Student 2007-08 ,Get Together Dt-08/11/2018

न्यू इंग्लिश स्कुल अस्तगाव,ता. राहाता,जि. अहमदनगर 
माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/११/२०१८ गुरुवार 
         न्यू इंग्लिश स्कुल अस्तगाव या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २००७-०८ मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या अद्यापकांसमवेत विद्यार्थी संमेलन गुरुवार दिनांक ८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले. 
सर्व प्रथम कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री सर्जेराव मते सर, श्री बनसोडे सर श्री तुपे सर आदि च्या हस्ते करण्यात आले. 
         मला या निमित्ताने विद्यालयात उपस्थित राहण्याचा योग आला. मी न्यू इंग्लिश स्कुल अस्तगांव या विद्यालयात दि. १/११/२००४ पासून पर्यवेक्षक या पदावर मोऱ्हांडा ता. मोखाडा,जी. ठाणे या विद्यालयातून बढतीवर बदलून आलो होतो. खरं तर मी विद्यालयात दि. ९/०६/२००६ पर्यंतच साधारणतः १ वर्ष, ७ महिने विद्यालयात कार्यरत होतो. मला नव्यानेच प्रमोशन मिळाले होते व मला आडगाव विद्यालयात खूप काटेकोर काम करायची सवय लागली होती. त्यामुळे मी अस्तगांव विद्यालयात झीप जोमाने व जबाबदारीने माझे काम करण्याचा शिकविण्याचा प्रयत्न केला. मी रुजू होण्या अगोदर ५ ते ६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे शिक्षकाच्या कमतरतेमुळे काही वर्गाचा पाठयक्रम  विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेला नव्हता. एका सातवीच्या वर्गाचे गणित मी शिकविण्यास घेऊन विदयार्थांची तयारी करून घेतली. एक शिंदे आडनावाच्या मुलीला सत्र १ ला   गणितात ५०  गुण पडले होते व सत्र २ ला तिला १०० गुण मिळाले होते. म्हणजे अस्तगाव मधील विद्यार्थ्यांमध्ये खूप टॅलेंट आहे. असाच एक प्रसंग आठवतो शैक्षणिक वर्ष २००५-०६ मध्ये नाताळ ची सुट्टी लागण्याच्या ४-५ दिवस अगोदर शिक्षण खात्याकडून एक सर्वेक्षण करण्याचा आदेश आला. शिक्षकांनी सर्वेक्षण करून आणून सर्व आकडेवारी माझ्याकडे देऊन नाताळ सुटीवर गेले. मला मात्र सुट्टीत ७ दिवस सर्व आकडेवारी चेक करून Tally  करून द्यावी लागली. असेच काम करत असतांना  जून मध्ये १०/०६/२००६ माझी बदली विंचूर येथे झाली होती. 
       विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे सर्व सहकारी यांच्या भेटी गाठी झाल्या. व आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांनी शिकत असतानाचे अनुभव अगदी खुमासदार पणे कथन केले. अभिजित गोर्डे ,राहुल गोर्डे, राहुल लोंढे,स्वप्नील गोर्डे,बाळू नरोडे आदी सर्वानी सतत पाठपुरावा करून मेळावा केला.त्यांचे सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप  अभिनंदन. 
       विद्यालयात काम करीत असताना कार्यरत सेवकाचे खूप सहकार्य मिळाले. श्री खरात सर, श्री गायकवाड सर ,श्री बनसोडे सर, श्री निर्मळ सर , श्री घोरपडे सर,श्री बोरुडे सर, श्री घोटकर सर, श्री तुपे सर, श्रीम. शेळके मॅडम,श्री दवंगे सर,विद्यालयाचे मुख्याध्यपक श्री सर्जेराव मते सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शिलेदार सर, श्री पावटे ,श्री जपे मामा  आदी उपस्थित होते. या निमित्ताने  पुन्हा भेटीचा योग आला. 
      विद्यालयाच्या विकासासाठी असे मेळावे आयोजित करून भरीव काम करण्यास नक्कीच हातभार लागेल. यात शंका नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचे  खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 

Comments

Popular posts from this blog

माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/०१/२०२३ रविवार

कळसूबाई शिखर -एक अनुभव