माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/०१/२०२३ रविवार

               न्यू इंग्लिश स्कुल  आडगाव , ता.जि.नाशिक 

       माजी विद्यार्थी व शिक्षक    संमेलन - दिनांक ८/०१/२०२३  रविवार 
    न्यू इंग्लिश स्कुल आडगाव  या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 1994-95 मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या अद्यापकांसमवेत विद्यार्थी संमेलन रविवार दिनांक ८/०१/२०२३ रोजी सकाळी १०  वाजता आयोजित केले होते.त्या प्रसंगी मला उपस्थित राहण्याचा योग आला.
       विद्यालयात नवीनच बांधलेल्या वर्गात  संमेलन आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी  वर्ग अतिशय छान सजविलेला होता. दरवाजास फुग्यांची कमान करून सजावट केली होती,एकंदरीत सर्व तयारी छानच केली होती. कर्मवीरांना अभिवादन राष्ट्रगीताने संमेलनाची सुरुवात केली. श्रीयुत सतीश रिकामे यांनी कार्लायक्रमाचे सूत्र संचालन केले.सदर संमेलनास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर तथा मॅनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य श्रीयुत वडजे बापू ,सौ.वडजे ताई, श्रीमती कुशारे मॅडम,श्रीयुत बोहरा सर, श्रीयुत शिंदे ई. वाय.श्रीयुत सोनवणे बी एम. श्रीयुत सालगुडे व्ही.एम. विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्रीयुत हिंडे एम. बी. सर, श्रीयुत माळी सर, श्रीयुत काळे बी. बी. आदि अध्यापक हजर होते. 

    २७ वर्षानंतर भेटलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आम्हा सर्व गुरुजनांचा शाल, श्रीफळ, पुष्प देवून यथोचित सत्कार केला.त्यात आम्ही सर्व गुरुजन कृतकृत धन्य झालो.
      माजी विद्यार्थांमध्ये श्रीयुत राजेंद्र  माळोदे, श्रीयुत शंकर मते, श्रीयुत थोरात, श्रीयुत सतीश रिकामे, श्रीयुत शरद शिंदे, श्रीयुत अनिल शिंदे, श्रीयुत नानासाहेब रिकामे,श्रीयुत लोहकरे, श्रीयुत रसाळ, श्रीयुत हेमंत शिंदे, श्रीयुत महावीर बोहरा,श्रीयुत टर्ले ,तसेच,महिला पैकी श्रीम. शुभांगी उदार, सौ. माधुरी माळोदे,शैला माळोदे, अर्चना कापसे, देशमुख, जयश्री तागड,दिपाली मुसळे,टर्ले,जया वाकचौरे,आदि. सर्वच नावे आठवत नाही. असे सर्व साधारणत: 55 ते 60 माजी विद्यार्थी  हजर होते. 
   एवढे माजी विद्यार्थी  व त्यांचा उत्साह पाहून खूप आनंद वाटला. आम्हालाही त्यावेळेच्या सर्व स्मृती जागृत झाल्या. सर्वच विद्यार्थ्यांनी त्यावेळचे आपले अनुभव सांगितले.त्यानंतर एका चांगल्या हॉटेल वर मिष्टान्न भोजनाची मेजवानी दिली. 
   मी आणि सोनवणे सर एकाच दिवशी १६/0६ /१९८१ रोजी न्यू इंग्लिश  स्कुल  विद्यायालयात  रुजू झालो. आडगाव मधील प्राथमिक शाळेतील शिक्षक खूप मेहनती होते, त्यामुळे विद्यालयात 5 वीत दाखल होणारे विद्यार्थी चांगले होते म्हणूनच आम्हाला देखील खूप तयारी करून वर्गात शिकविण्याची सवय लागली. मी सतत गणित त्यातही भूमिती विषय शिकविला सुरुवातीस खूप तयारी करून शिकवावयास लागायचे कारण समोर असलेले तुम्ही विद्यार्थी दक्ष होते,विद्यार्थ्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत एखादा मुद्दा/ संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.यातून आमची देखील जडण घडण होत गेली.त्या वर्षी श्री  वडजे बापू , श्री बोहरा  सर यांच्या प्रयत्नाने विद्यालयाची  सहल रेल्वेने दिल्लीला गेली होती. त्यातील काही अनुभवांची  सहजच आठवण झाली.
  सन 1989-90 पासून  श्री वडजे बापू, दिवंगत श्री हिंगे सर यांच्या मार्गदर्शनाने त्या वेळच्या सर्व अध्यापक वर्गाच्या प्रयत्नाने विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत गेला.श्री वडजे बापूंनी सांगितले की या विद्यालयातून त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर काम करण्याची महत्वाची संधी मिळाली.त्यांनी सर्वांना त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रणही दिले.श्री बोहरा सरांनी सागितले की,आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळेच त्यांना रयत सेवक को- ऑप बँकेचे चेअरमन मिळण्याचा बहुमान मिळाला.श्री सोनवणे सर श्री शिंदे ई. वाय. सर श्रीम. कुशारे मॅडम यांनी देखील आपले अनुभव कथन केले. 
   विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री हिंडे सरांनी सांगितले की,आपण या विद्यालयात शिकला आहात.आपण असे संमेलन घेऊन आपले विचार /अनुभव शेअर करा.विद्यालयात आता जुन्या इमारतीच्या पाच खोल्या पाडून नवीन सहा खोल्यांचे अद्ययावत बांधकाम आपल्या गावांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.अजूनही ग्रांऊडवर पेव्हर ब्लॅाक बसविण्याची योजना प्रस्तावित आहे.यासाठी आपणास काही योगदान देता येईल ते आपण करावे. असे आवाहन केले.
 यानंतर श्री माळी सरांनी सांगितले की,आपण खूप हौशीने मेळाव्याची जय्यत अशी छान तयारी केली.
     नंतर सर्वांनी  बालाजी हॅाटेल वर पुन्हा एकत्रित येऊन आपला परिचय व अनुभव कथन केले व छान असा  भोजनाचा आस्वाद आम्ही सर्वांनीच घेतला.
   विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे सर्व सहकारी यांच्या भेटी गाठी झाल्या,आठवणींना उजाळा मिळाला,विद्यार्थ्यांनी शिकत असतानाचे अनुभव अगदी खुमासदार पणे कथन केले. विद्यार्थी मित्रांचे खूप खूप  अभिनंदन. We all of teachers are proud of such students who felicitated us heartily.आपण सर्व विविध क्षेत्रात कार्यरत आहात . आपल्या कार्यास व आपणास हार्दिक शुभेच्छा.
       विद्यालयात काम करीत असताना कार्यरत सेवकाचे खूप सहकार्य मिळाले.विद्यालयाच्या विकासासाठी असे मेळावे आयोजित करून भरीव काम करण्यास नक्कीच हातभार लागेल. यात शंका नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचे  खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 

'' failed to upload. Invalid response: RpcError

Comments

Popular posts from this blog

कळसूबाई शिखर -एक अनुभव

New English School Astgaon, Former Student 2007-08 ,Get Together Dt-08/11/2018