Posts

Showing posts from January, 2023

माजी विद्यार्थी व शिक्षक संमेलन - दिनांक ८/०१/२०२३ रविवार

Image
                  न्यू इंग्लिश स्कुल  आडगाव , ता.जि.नाशिक         माजी विद्यार्थी व शिक्षक       संमेलन - दिनांक ८/०१/२०२३  रविवार       न्यू इंग्लिश स्कुल आडगाव  या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 1994-95 मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या अद्यापकांसमवेत विद्यार्थी संमेलन रविवार दिनांक ८/०१/२०२३ रोजी सकाळी १०  वाजता आयोजित केले होते.त्या प्रसंगी मला उपस्थित राहण्याचा योग आला.        विद्यालयात नवीनच बांधलेल्या वर्गात  संमेलन आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी  वर्ग अतिशय छान सजविलेला होता. दरवाजास फुग्यांची कमान करून सजावट केली होती,एकंदरीत सर्व तयारी छानच केली होती. कर्मवीरांना अभिवादन राष्ट्रगीताने संमेलनाची सुरुवात केली.  श्रीयुत सतीश रिकामे यांनी कार्लायक्रमाचे सूत्र संचालन केले. सदर संमेलनास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर तथा मॅनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य श्रीयुत वडजे बापू ,सौ.वडजे ताई, श्रीमती कुशारे...