Posts

Showing posts from November, 2017

कळसूबाई शिखर -एक अनुभव

Image
          मी वसंत मुरलीधर सालगुडे (नाशिक)  श्री विलास, सुनिल, ज्ञानेश्वर शिवाजी खांडबहाले (महिरावणी ) आदि        आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच असलेले कळसूबाईचे शिखर सफर करण्याचे ठरविले.          आम्ही सर्वानी ठरवले की, दि. १५/१०/२०१७ रविवार रोजी पहाटे  ५ वाजता कळसुबाई   शिखर  ट्रेकिंग साठी नाशिक हून निघून  टाकेद मार्गे जायचे. परंतु  निघताना  थोडा  उशीर होऊन सकाळी ६ वाजता टाकेदला निघालो.           (१)सर्वतीर्थ टाकेद            टाकेद नाशिक पासून साधारणतः ५२ किलोमीटर आहे. आम्ही नाशिकरोड हुन पांढुर्ली मार्गे टाकेद ला निघालो. व  सकाळी ८.३० वाजता तेथे पोहचलो.            सर्वतीर्थ टाकेद हे देखील अतिशय चांगले देवस्थान आहे.  तेथे जटायूचे मंदिर व मोठे शिल्प आहे. रामायण काळात  प्रभू श्रीराम ,लक...